बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

लसीकरणातून मुक्‍ती की व्‍याप्‍ती? लोणार ग्रामीण रुग्‍णालयात गर्दीच गर्दी, सुरक्षित अंतर ‘गायब!’

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः पाच दिवसांच्‍या प्रतीक्षेनंतर लोणारमध्ये कोरोना लस दाखल झाली. मात्र ती घेण्यासाठी व्‍यवस्‍थित नियोजन न केल्याने लाभार्थ्यांनी एकच गर्दी केली. यात  सुरक्षित अंतर ठेवले गेले नाही. त्‍यामुळे लसीकरणामुळे आजारातून मुक्‍ती मिळणार की आजाराची व्‍याप्‍ती आणखी वाढणार हा प्रश्न आज, 6 मे रोजी निर्माण झाला होता. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज होती.

तालुक्‍यात एकूण 900 व्‍हॅक्सिन प्राप्‍त झाल्‍या. पैकी लोणार ग्रामीण रुग्‍णालयासाठी 400 तर अन्य चार प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी प्रत्‍येकी 100 आणि बिबी येथील रुग्‍णालयाला 100 व्‍हॅक्‍सिन पुरवण्यात आल्या. लसीकरणासाठी एकूण 5 जणांची टीम कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्‍यांना रुग्‍णालयांचे कर्मचारीही सहकार्य करत आहेत. आज 45 वर्षांवरील व्‍यक्‍तींना दुसरा डोस प्राधान्याने देण्यात आल्‍याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. राठोड यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली. तालुक्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त व्‍हॅक्सिन मागणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, ग्रामीण रुग्‍णालयात व्‍यवस्‍थित नियोजन नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांनी गर्दी केली. त्‍यांच्‍यात कोणतेही सुरक्षित अंतर ठेवले गेलेले नव्‍हते. त्‍यातही आलेल्या डोसची संख्या कमी असल्‍याने रुग्‍णालयाच्‍या कर्मचाऱ्यांनी ‘आपापल्या व्‍यक्‍तींना’ प्राधान्य दिल्याची चर्चा होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close