क्राईम डायरी

लाख रुपयांसाठी विवाहित तरुणीला मारहाण!; खामगावमधील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माहेरावरून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्‍हणून २४ वर्षीय विवाहितेचा छळ मांडला. पतीसह सासू,सासरा, दीर, नणंद यांनी मिळून मारहाण केल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. राणी राहुल वानखेडे (२४,रा. शिक्षक कॉलनी, खामगाव, ह. मु. अकोली) या विवाहितेने काल, १५ जुलैला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की २४ एप्रिलला रात्री ८ च्या सुमारास पती राहुल वानखेडे याने वडिलांच्या जागेवर नोकरीवर लागण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. वडिलांजवळ पैसे नसल्याचे सांगितले असता त्‍याने वडिलांना शेती माग असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासू चंद्रकांता भारत वानखेडे, दीर संजय भारत वानखेडे, दिरानी निकिता संजय वानखेडे (सर्व रा. शिक्षक कॉलनी खामगाव) व नणंद सौ. सपना निखिल विरघट (रा. कुरखेड, ता. शेगाव) यांनी एकमत करून जोपर्यंत वडिलांकडून पैसे आणत नाही तोपर्यंत हिला घरात वागवू नका. घराबाहेर काढून द्या, असे म्हणून शिविगाळ केली व शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्‍यामुळे सासरच्या मंडळीविरुद्ध महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दिली होती. मात्र तिथे समझोता न झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्‍यावरून पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ काशीराम जाधव करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: