क्राईम डायरी

लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, घरी परतताना कामगाराचा मृत्‍यू; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय महामार्गावरील वडी पेट्रोलपंपाजवळ 47 वर्षीय व्यक्तीचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना 18 एप्रिलच्या संध्याकाळी 6 च्‍या सुमारास घडली.

निरंजन कुमार यादव (18, रा. अजऊर जि. बलिया, उत्तरप्रदेश) यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की मी पुणे येथे मजुरीचे काम करतो. मात्र लॉकडाऊनमुळे काम नसल्याने गावी परतत असताना वडी पेट्रोलपंपाजवळील हॉटेलवर पाणी पिण्यासाठी थांबलो असता सोबत असलेले विरेंद्रा बाळेश्वर गिरी (47, रा. अजउर,  उत्तरप्रदेश) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते खाली बसले. त्यावेळी त्यांना काय झाले असे  विचारले असता ते काहीही बोलले नाही. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार, प्रवीण डवंगे, आनंद वावगे यांच्यासह पो.काँ. सलीम बरडे यांनी रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तीला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर उमाळे, एएसआय चंद्रकांत मोरे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: