बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

लोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातील बसस्‍थानक भागातील लोणी रोडवरील अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँकेला आज, २२ जुलैला रात्री साडेनऊच्‍या सुमारास आग लागली. बँकेतून धूर निघत असल्याने रहिवाशांनी तातडीने अग्‍निशमन विभागाला कळवले. अग्‍निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन रहिवाशांच्‍या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत. सव्वा दहापर्यंत आग विझवणे सुरूच होते. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीतील नुकसानीचा आकडा उद्याच समजू शकेल.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: