क्राईम डायरीमुख्य बातम्या

लोणार सरोवर पाहण्यासाठी जात होते मध्येच दुर्दैव आड आले…!

ट्रकची कारला धडक, एक ठार,एक जखमी
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
: 3 औरंगाबादहून लोणारकडे जाणार्‍या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार तर 1 जखमी झाला. ही घटना सिंदखेड राजा- जालना रोडवर मोती तलावाजवळ 9 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता घडली. आसिफ खान इस्माईल खान (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
व्यवसायाने वकील असलेले संतोष कौतिक इंगळे (41, रा. मुक्ताईनगर) हे त्यांच्या दोन मित्रांसह हायकोर्टाच्या कामासाठी औरंगाबादला गेले होते. 9 फेब्रुवारीला काम आटोपून ते सायंकाळी 7 वाजता औरंगाबादहून लोणारकडे निघाले होते. रात्री 8:30 वाजता सिंदखेडराजा येथील मोती तलावाजवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. धडकेत आसिफ खान इस्माईल खान हे जागीच ठार तर आत्माराम जाधव गंभीर जखमी झाले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: