क्राईम डायरीमुख्य बातम्या

5 लाखांसाठी ‘तलाक’ची धमकी; 7 जणांविरोधात बुलडाण्यात गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्या वडिलांनी लग्‍नात ठरवलेले 5 लाख रुपये आण नाहीतर तुला तलाक देईन, अशी धमकी देत विवाहितेला मारहाण व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या 7 जणांविरोधात बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वंशराह मुस्कान शेख (20, ह.मु. जवाहरनगर, बुलडाणा) हिचा विवाह अमरावती येथील शेख मुजाहिद शेख मोबिन (32) याच्‍याशी 24 फेब्रुवारी 2019 रोजी झाला होता. विवाहितेच्या वडिलांनी तेव्हा 50 हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य दिले होते. काही दिवस आनंदात गेल्यानंतर मात्र 5 लाख रुपयांची मागणी पतीसह सासू, दीर नणंद करू लागले. विवाहितेच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी देऊळघाट येथील एक प्लॉट राहण्यासाठी जावयाला दिला. त्यानंतर पुन्हा काही महिने विवाहितेला नीट वागवले. त्यानंतर मात्र प्लॉट नावावर करून द्या नाही तर 5 लाख द्या, अशी मागणी पती विवाहितेकडे करू लागला. त्यासाठी वारंवार छळ व मारहाण सुद्धा केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 5 लाख रुपये दिले नाहीत तर तलाक देऊ अशा धमक्या व मारहाण झाल्याने ऑक्टोबर 2020 पासून ती वडिलांकडे राहते.आज विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून तिचा पती शेख मुजाहिद शेख मोबिन (32, रा. पॅराडोईझ कॉलनी,राजकमल चौक अमरावती) याच्‍यासह सासू, दीर व नणंद व नंदोई अशा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: