खामगाव (घाटाखाली)

वसीम रिझवीचा शेगावात निषेध

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  लखनौ येथील वसीम रिझवीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत मुस्लिम धर्माचे पवित्र कुराणमधील काही भाग हटवण्याची मागणी केली आहे. शिवाय मुस्लिम धर्म आणि मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात विविध गैरसमज पसरवत आहे. त्याच्या निषेधार्थ आज, 20 मार्चला मौलाना अर्शद मदनी प्रणीत जमियत उलमाये हिंदच्या शेगाव तालुका आणि शहर शाखेतर्फे ठाणेदारांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अनिस यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यासाठी तालुकाध्यक्ष मौलाना न्यामतुल्लाह खान, शहर अध्यक्ष हाफिज उस्मान, तालुका सचिव डॉ.असलम खान, जुबेर सहारा, हाजी बिस्मिल्लाह. हाफिज वकार खलील ठेकेदार. शेख अतहर आदींची उपस्थिती होती.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: