क्राईम डायरी

विकृती..! भावानेच बहिणीचे घर पेटवले; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भावानेच बहिणीचे घर पेटविल्याची घटना गेरू (ता. खामगाव) येथे 16 मार्चच्‍या दुपारी घडली. या प्रकरणात आज, 17 मार्चला हिवरखेड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. घटनेत 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सौ. मंदा सुनील बटवाडे (41, रा. गेरू) यांनी मोतीसिंग हरिराम खसावत (रा. गेरू) याच्‍याविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की माझा भाऊ मोतीसिंग हरिराम खसावत हा काल 16 मार्चला दुपारी 2.30 च्या सुमारास मद्यपान करून घरी आला व विनाकारण शिविगाळ करू लागला. त्याला मी व माझ्या मुलांनी घराबाहेर जा, असे म्हटले तर त्याने आरडाओरडा करून घरातील सामान इकडे तिकडे फेकायला सुरू केले. मी व माझ्या मुलाने घराला कडी लावून दुसऱ्याच्या घरात निघून गेलो असता मोतीसिंगने त्याच्या घरातून ताटात विस्तव आणून माझ्या घराची कडी उघडून घरात असलेल्या सामानाला आग लावली. यात बिछाना, वापरातील कपडे, भांडी मुलाच्या खिशात असणारे पैसे व शाळेची पुस्तके व शाळेची कागदपत्रे जळाली. अंदाजे 15 ते 20 हजार रुपयाचे नुकसान झाले. पोलिसांनी मोतीसिंग विरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास एएसआय लालसिंग चव्हाण करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: