बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

विजांचे तांडव!; मेहकरमध्ये महिलेचा बळी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लाखो बुलडाणा जिल्ह्यावासियांनी काल, 19 मार्चच्‍या संध्याकाळी व रात्री विजेचे तांडव व रुद्रावतार काय राहतो, याचा थरारक अनुभव घेतला. घनदाट अंधारात होणारा कडकडाट व  अंधार उजेडाचा हा खेळ अनेकांनी मोबाइलबद्ध केला! एकीकडे हा थरार रंगत असतानाच मेहकर तालुक्यात हीच वीज एका महिलेसाठी काळ ठरली! 

19 मार्चच्या संध्याकाळी ते रात्री 8.30 वाजेदरम्यान कमीअधिक हजेरी लावणाऱ्या पावसादरम्यान विजेचे तांडव सुरू राहिले! आभाळ दाटून आल्याने व जिल्हाभरातील वीज पुरवठा खंडीत असल्याने विजेचा हा थरार अधून मधून आसमंत उजळवत होता. दरम्यान दामिनेचे हे तांडव मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक परिसरात हिंसक ठरले! त्याने कासाबाई उत्तम नागोलकर या 55 वर्षीय महिलेचा बळी घेतला. अंजनी शिवार परिसरातील गट क्रमांक 258 मधील शेतातील गोठ्यात त्या राहत होत्या. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास नेमके त्या गोठ्यावर विजेचा प्रलयंकारी लोळ कोसळला अन्‌ कासाबाई गतप्राण झाल्या! अंजनी बुद्रूकच्‍या तलाठ्यांनी याचा अहवाल मेहकर तहसीलदारांना सादर केला. या दुर्घटने मुळे अंजनी परिसरासह मेहकर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: