क्राईम डायरी

विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्‍यू; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विजेचा धक्का बसून इसरखेड (ता. नांदुरा) येथील विलास मधुकर कांडेलकर (27) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इसरखेड गावठाण जवळील विद्युत रोहित्राजवळ 9 एप्रिलच्‍या दुपारी 4 च्‍या सुमारास घडली.

या संदर्भात ज्ञानदेव कडू कांडेलकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. विलास वेडसर असल्याने गावठाण जवळील रोहित्राजवळ गेला असता त्याला शॉक लागला. तो तेथेच मरण पावला. तपास चांदुर बिस्वा येथील पोलिस चौकीचे एएसआय मनोहर बोरसे करीत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: