क्राईम डायरीमुख्य बातम्या

विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; देऊळगावराजा तालुक्यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बांधकामावर पाणी मारताना विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल, १३ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्‍या सुमारास जवळखेड (ता. देऊळगाव राजा) येथे घडली. कार्तिक दीपक वैद्य असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

कार्तिक त्यांच्या जवळखेड येथील शेत शिवारात सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत होता. पाणी मारत असताना मोटारीचा शॉक लागून तो कोसळला. ही बाब त्याच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: