क्राईम डायरीमुख्य बातम्या

विधवा भावजयसह 2 चिमुकल्या मुलींवर जीवघेणा हल्ला! चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरगुती वादातून दिराने विधवा भावजय आणि तिच्या दोन मुलींवर कोयत्याने हल्ला केला. यात तिघी जखमी झाल्या आहेत. ही घटना चिखली तालुक्यातील सवणा येथे ६ मार्चला घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात जखमी महिलेच्या काल, 8 मार्चला दिलेल्या तक्रारीवरून दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .

शारदा वसंता हावरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. शारदा हावरे या त्यांच्या दोन मुलींसोबत राहतात. शेतात शेतमजुरी करतात. 2015 मध्ये त्यांचे पती वसंता हावरे यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून त्यांचा दिर प्रभाकर हावरे हा त्यांच्यासोबत आणि दोन मुलींसोबत लहानसहान कारणांवरून भांडण करत असतो आणि विनाकारण त्रास देतो. 6 मार्च 2021रोजी रात्री घराशेजारी राहणाऱ्या महिलेसोबत बोलत असताना त्यांच्या दिराने काही एक कारण नसताना कोयत्याने मुलीवर वार केले. यात मुलीचा डावा कान कापला गेला आहे. मुलीचे रक्त निघत असताना तिला वाचविण्यासाठी धावलेल्या शारदा यांच्या हाताला मार लागून त्याही जखमी झाल्या. यावेळी दुसरी मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्याने तिच्यासुद्धा कानावर कोयता मारून जखमी केले. यापूर्वी सुद्धा प्रभाकर हावरे याने शिविगाळ करत जीवे मारून टाकीन, तुमचा खून करेन अशा धमक्या दिल्या असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. जखमी महिलेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपी दिर प्रभाकर नामदेव हावरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: