क्राईम डायरीमुख्य बातम्या

विवाहिता प्रियकरासोबत फरार; पतीला फोन करून प्रियकर म्हणतो… चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहाटे 5 वाजता शौचास जाते, असे सांगून गेलेली विवाहिता प्रियकरासोबत फरार झाली आहे. ही घटना मुरादपूर (ता. चिखली) येथे समोर आली. विवाहितेच्या वडिलांनी काल, 12 फेब्रुवारीला याप्रकरणी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली आहे.
संगीता अशोक महाडिक (27) असे विवाहित महिलेचे नाव असून, तिला दुसरबीड (ता. सिंदखेडराजा) येथे देण्यात आले होते. तिचे दुसरबीड येथीलच घराशेजारच्या भगवान विष्णू महाडिक याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने तिच्या पतीने माहेरी मुरादपूर येथे आणून घातले होते. दरम्यान 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता ती शौचास जाते असे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान, 9 फेब्रुवारीला जावई नितीन पोटरे यांच्या मोबाइलवर विवाहितेचा प्रियकर भगवान विष्णू महाडिक याने फोन करून सांगितले की संगीता माझ्यासोबत आहे. तुम्ही शोधू नका. आम्हाला मदत करा, असे म्हणत फोन ठेवून दिला, असे विवाहितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: