क्राईम डायरीमुख्य बातम्या

विवाहितेने 3 वर्षीय चिमुरडीसह घेतली विहिरीत जलसमाधी!; माळवंडी हादरले!!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 30 वर्षीय विवाहितेने आपल्या 3 वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्‍कादायक घटना माळवंडी (ता. बुलडाणा) येथे आज, 18 मे रोजी दुपारी साडेतीनच्‍या सुमारास घडली.

सौ. पल्लवी गणेश चव्‍हाण (30, रा. माळवंडी), जान्‍हवी गणेश चव्‍हाण (3) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. तिने माळवंडी शिवारातील आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्‍णालयात पाठवले आहेत. तपास ठाणेदार श्री. दुधाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश मोरे, एएसआय यशवंत तायडे, एनपीसी शेख कईम करत आहेत. विवाहितेने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: