क्राईम डायरीमुख्य बातम्या

वीज कापणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः थकीत बिलासाठी वीज कापणाऱ्या महावितरणच्‍या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना गायगाव खुर्द (ता. शेगाव) येथे आज, 11 मार्चला दुपारी अडीचच्‍या सुमारास घडली.

राजेंद्र गुलाबराव सोनोने आणि त्‍यांच्‍या दोन साथीदारांविरोधात महावितरणचे तंत्रज्ञ शत्रुघ्न वामनराव गावंडे (28, रा. माटरगाव ता. शेगाव) यांना तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत शेगाव येथे तंत्रज असून, त्यांच्‍याकडे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व थकीत विजबिलाची वसुली करणे ही ड्यूटी आहे. ते गायगाव खुर्द येथे विद्युत बिलाच्‍या वसुलीसाठी गेले असता सोनोने याने साथीदारांसह आमच्या घरी बिलाची वसुली करण्यासाठी कसे काय गेले होते, असे म्हणून वाद घालून अंगावर धावून येऊन चापटा व लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली व शिविगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. त्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरिक्षक अरविंद कुमरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: