बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

वेळीच माणसे धावून आले म्‍हणून वाचली ‘ती’… चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रानडुकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज शिवारात काल, 4 मार्चच्‍या दुपारी 1 च्‍या सुमारास घडली.
खंडाळा मकरध्वज येथील सौ. सीमा भगवान सिताफळे या वायझडी धरणाजवळ असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या होत्या. त्याचवेळी शेतात दडून बसलेल्या रानडुकरांनी हैदोस घालायला सुरुवात केली. त्यात एका डुकराने सौ. सीमा यांच्यावर जीवघेणा हल्ला करीत त्यांच्या पायाचा चावा घेतला व गंभीर जखमी केली.महिलेने प्रतिकार करीत आरडा ओरड केल्याने शेतशिवारातील माणसे धावून आले. त्यांनी रानडुकरांना हुसकावून लावले. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला बुलडाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: