बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

वैष्णव गडावर महापूजेला पालकमंत्री येणार नाहीत, कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याची सानप गुरूजींची माहिती

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावालगतच्‍या वैष्णव गडावर आषाढी एकादशीला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते महापूजा होणार होती. कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यामुळे उद्या, २० जुलैला त्‍यांच्‍या हस्‍ते पूजा होणार नाही, अशी माहिती हभप सानप गुरुजी यांनी केले आहे. मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांनी परिसरात गर्दी करू नये, असे आवानही त्‍यांनी केले आहे. हरिभक्त पारायण सानप गुरुजी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे. ज्याप्रमाणे पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होते, त्याचप्रमाणे प्रतिपंढरपूर वैष्णव गड येथे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते महापूजा होणार होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close