क्राईम डायरीमुख्य बातम्या

व्हिडिओ कॉल करून महिलेने काढायला सुरुवात केली कपडे… युवकाचे उडाले होश!; नांदुरा शहरातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुपारची वेळ… अचानक त्‍याला व्‍हॉट्‌स ॲपवर व्‍हिडिओ कॉल आला… उत्‍सुकतेने त्‍याने कॉल उचलताच समोरून एक महिला चक्‍क अंगावरचे कपडे काढत होती… हा अचंबित करणारा प्रकार पाहून घाबरलेल्या युवकाने तातडीने कॉल कट केला… मात्र हा प्रकार म्‍हणजे त्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा कट होता, हे पुढच्‍या काही मिनिटांतच समोर आले. त्‍याला पैसे टाक अन्यथा तुझा व्‍हिडिओ व्‍हायरल करू, अशी धमकी देण्यात आली. या युवकाने नांदुरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून, आता पोलीस ती महिला आणि धमकी देणारा पुरुष यांचा शोध घेत आहेत.

हनी ट्रॅप लावून आर्थिक फसवणुकीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्‍या आहेत. सुरुवातीला शरीरसंबंधाचे आमिष दाखवायचे आणि नंतर त्‍याचाच व्‍हिडिओ बनवून लुटमार करायची हा नवीनच धंदा काही महिलांनी पुरुषांच्‍या मदतीने सुरू केला आहे. अशाच एका प्रकरणात नांदुऱ्याचा हा युवक अडकता अडकता वाचला. नांदुरा शहरातील एका 21 वर्षीय युवकाला 7 एप्रिल रोजी त्याच्या व्‍हॉट्स ॲपवर 9707468233 या नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. तो युवकाने उचलला असता समोरून एक हिंदीभाषिक महिला बोलली की ‘तुम्हारे सीवा इस दुनिया में मेरा कौन हैं…’ असे म्हणतानाच तिने थेट तिच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली. हा प्रकार बघून भांबावलेल्या युवकाने तातडीने कॉल कट केला. घाबरून मोबाइलही स्‍विच ऑफ केला. थोड्या वेळाने मोबाइल चालू केल्यानंतर त्याच मोबाइलवरून युवकाला पुन्हा फोन आला. यावेळी एक पुरुष बोलत होता. पुरुषाने धमकी दिली की, ‘हमने तुम्हारा व्हिडिओ बनाया हैं… तुम मेरे अकाउंटपर 5000 रुपये भेजो नहीं तो तुम्हारा व्हिडिओ हम सोशल मीडियापर व्हायरल करेंगे… ‘ त्यानंतर पुन्हा दोन- तीन वेळा फोन करून पैसे डालता की नहीं… अशी धमकी या युवकाला देण्यात आली. त्‍यानंतर मात्र युवकाने धाडस करून नांदुरा पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार घेऊन तपास सुरू केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: