बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शनिवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत कर्फ्यू! एसटी, मालवाहतूक, आरोग्यसेवा 24 तास, डेअरी, पंक्चर वगळता इतर दुकाने राहणार बंद!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेला जनता कर्फ्यूचा सिलसिला कायम राहणार आहे. शनिवारी, 6 मार्चच्‍या संध्याकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. मोजकी सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असून, नागरिकांना अकारण भटकणे महागात पडू शकते.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज 5 मार्च रोजी संध्याकाळी या संदर्भातील आदेश निर्गमित केले. यादरम्यान एसटी प्रवासी वाहतूक ( 50 टक्के क्षमतेसह) , मालवाहतूक, दवाखाने, ॲम्ब्युलन्स सेवा, मेडिकल स्टोअर, पेट्रोल पंप या मोजक्या सेवांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. डेअरी सकाळी 6 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या काळात सुरू राहणार आहे. कर्फ्यूदरम्यान नागरिकांना अकारण बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: