बुलडाणा (घाटावर)

शहीद जवान सतीश पेहरे यांच्या स्‍मारकाचे लोकार्पण

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अमोना (ता. चिखली) येथील शहीद जवान सतीश सुरेश पेहरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वरूड (ता. जाफराबाद) काल १४ जुलैला सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्करराव पडघान यांच्‍या हस्ते शहीद जवान पेहरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. १४ जुलैला रोजी गलवान घाटी, लडाख (जम्मू आणि काश्मीर) येथे ऑपरेशन रक्षकमध्ये त्‍यांना वीरमरण आले होते. स्‍मारकाच्‍या लोकार्पणावेळी तहसीलदार आनंद सोनी (जाफराबाद), वीरपत्‍नी श्रीमती जया, वीरपिता सुरेश पेहरे यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय मान्यवरांची उपस्‍थिती होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close