चंदेरी

शाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार

बाॅलिवूड किंग शाहरूख खान याच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्रींची धडपड असते. चित्रपटसृष्टीत २९ वर्षे पूर्ण केली असली तरी या सदाबहार अभिनेत्याचं अजूनही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘बादशाह’ या चित्रपटात शाहरूख खानची प्रमुख भूमिका आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं शूटिंग सुरू होत आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे. नायिका म्हणून नयनतारा हिचं नाव फायनल झालं आहे. तिनं हा चित्रपट साइन केला आहे.

एटली ‘बादशाह’ या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहेत. नयनतारा शाहरूखसोबत काम करणार असल्याच्या चर्चा या अफवा असल्याचं सांगितलं होतं; परंतु आता तिच्यासोबत करार करण्यात आला. तिच्याबाबत बाॅलिवूडमधील एन्ट्रीबाबच एवढी गोपनीयता का पाळण्यात आली, हा संशोधनाचा भाग आहे. एटली यांच्या चित्रपटात शाहरूख सोबत नयनताराचा रोमान्स दिसणार आहे. शाहरूखची रेड चिलीज ही कंपनी या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटासाठी नयनताराने बरीच मेहनत सुरू केली. नयनतारा ही दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या कारकीर्दीची सुरुवात २००३ मध्ये झाली. अलिकडच्या काळात ती मल्याळम चित्रपट ‘निझालl’मध्ये दिसली होती. ‘चंद्रमुखी’, ‘गजनी’, ‘श्री राम राज्यम’, ‘पुथिया नियमम’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळविलेली नयनतारा आता शाहरूख खानसोबत कसं काम करते, हे पाहण्यासाठी फॅन्स आतुर झालेले आहेत. या चित्रपटात शाहरूख खानचा डबल रोल आहे. तो त्याचे सिक्स पॅक देखील दाखवणार आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: