बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शुभवार्ता! आज एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही; जिल्ह्यात आजपर्यंत साडेसात लाख नागरिकांच्या तपासण्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज नागपंचमीचा दिवस जिल्हावासीयांसाठी बहुप्रतिक्षीत आनंदवार्ता घेऊन उजाडला. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत कोरोनाचा आज एकही रुग्ण आढळला नाही.

आरटीपीसीआर तपासणीसाठी ६९७ अहवाल पाठवले होते तर १८३० जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. प्राप्त झालेल्या २५२७ अहवालांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. आजच्या तारखेत जरी कोरोनाचा रुग्ण सापडला नसला तरी जिल्हा अजून कोरोनामुक्त झाला नाही. जिल्ह्यात सध्या ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत तब्बल ७लाख ४९हजार ८०० जणांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यापैकी ८६ हजार ६१२ जण कोरोनाबाधित सापडले. ६ लाख ६३ हजार १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ६७२जणांनी कोरोनामुळे आजवर जीव गमावला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: