क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेगावच्‍या अंबर लॉजवर देहव्‍यापारासाठी आणली होती तरुणी; पोलिसांनी ग्राहकासह मॅनेजरला पकडले!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देहव्‍यापारासाठी आणलेल्या तरुणीसह ग्राहक आणि लॉज व्‍यवस्‍थापक अशा तिघांना शेगाव शहर पोलिसांनी ताब्‍यात घेतले. ही कारवाई काल, 24 एप्रिलच्‍या रात्री दहाच्‍या सुमारास शेगाव शहरातील बाळापूर रोडवरील अंबर लॉजवर करण्यात आली. कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

लॉज व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शेगाव), ग्राहक कुलदीप शिवाजी भाकरे (३०, रा. मोरगाव भाकरे, जि.अकोला) दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले, पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे यांच्‍यासह पथकाने गोपनीय माहितीवरून हॉटेल अंबर लॉजवर छापा मारला. तिथे एक तरुणी, व्यवस्थापक प्रवीण तायडे आणि ग्राहक कुलदीप भाकरे असे दोन जण मिळून आले. देहव्यापारासाठी आणलेल्या महिलेसह दोघांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांच्‍याकडून नगदी ४ हजार ४०० रुपये, एक कंडोम पाकिट किंमत २० रुपये, अनवॉंन्टेड गोळ्यांचे पाकिट ज्यात १७ गोळ्या किंमत ६० रुपये असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक श्री. दंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास शेगाव ठाणेदार संतोष ताले करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: