शेगावमध्ये महिलेची, चिखलीत तरुणाची आत्‍महत्‍या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 मे रोजी दोन आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत. तिवान खुर्द (ता. शेगाव) येथे 35 वर्षीय महिलेने राहत्या घरात लाकडी बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला तर भालगाव (ता. चिखली) येथे 22 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी समोर आले. तिवान खुर्दला येथे आत्महत्या करणाऱ्याचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 मे रोजी दोन आत्‍महत्‍याच्‍या घटना समोर आल्या आहेत. तिवान खुर्द (ता. शेगाव) येथे 35 वर्षीय महिलेने राहत्‍या घरात लाकडी बल्लीला ओढणीच्‍या साह्याने गळफास घेतला तर भालगाव (ता. चिखली) येथे 22 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याचे आज सकाळी समोर आले.

तिवान खुर्दला येथे आत्‍महत्‍या करणाऱ्याचे महिलेचे नाव सौ. विद्या संदीप पहुरकर असे आहे. आत्‍महत्‍येची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. आत्‍महत्‍येचे कारण सायंकाळपर्यंत समोर आले नव्‍हते. दुसऱ्या घटनेत आत्‍महत्‍या करणाऱ्या तरुणाचे नाव आकाश गजानन परिहार (रा. भालगाव, ता. चिखली) असे  आहे. त्‍याने शेतातील गोंधनाच्या झाडाला रात्रीच गळफास घेतला. आज आंब्याची राखणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. वृत्त कळताच चिखली पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. आज दुपारी त्याच्‍यावर भालगाव येथे अंत्यसस्कार करण्यात आले. आत्महत्येला प्रेमसंबंधाची किनार असल्याचे बोलले जाते.