क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेगावमध्ये व्‍यापाऱ्याला मारहाण, दुकानातील सामानाची फेकझोक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः  शेगाव शहरातील अग्रसेन भवनसमोरील हार्टबीट आईस्क्रीम पार्लरच्‍या मालकाला चौघांनी मारहाण केली. दुकानातील सामानांची फेकझोक केली. ही घटना 24 मार्चच्‍या दुपारी एकच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

श्रीकांत अनिल पाडिया (36, रा. अग्रसेन चौक) यांच्‍याकडे प्रभात आईस्क्रीमची एजन्सी असून, ते ठोक व चिल्लरमध्ये विक्री करतात. त्‍यांनी आठ दिवसांपूर्वी शेख मोसीम (रा. आठवडी बाजार) याला उधारीने माल दिला होता. त्‍याचे पैसे त्‍याने दोन दिवसांपूर्वी दिले. व्‍यवहार चांगला नसल्याने पाडिया यांनी त्‍याला पुन्‍हा उधारीवर माल देण्यास नकार दिला. त्‍यामुळे संतापून त्‍याने काल दुपारी दुकानावर हल्ला चढवत पाडिया यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील सामानाचीही फेकझोक केली. तिथे जमलेल्या लोकांनी कशीबशी त्‍यांची सुटका केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: