खामगाव (घाटाखाली)

शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांना मानाचे पोलिस महासंचालक पदक; 15 वर्षांची सेवा, आजवर 150 हून अधिक सन्‍मान!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाचे पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. यात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांचाही पदक देऊन गौरव करण्यात आला. पोलीस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना हे पदक बहाल करण्यात आले.

पोलीस विभागात काम करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळेस चोखपणे कर्तव्य बजावत असताना नागरिकांशीही चांगले संबंध ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्‍नरत राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभागाकडून विविध पदचिन्हे देऊन सन्मानित करण्यात येते. यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस महासंचालक यांचे पदचिन्हासाठी राज्यातील कर्मचारी व पोलिसांची अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात ठाणेदार श्री. सूर्यवंशी यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना मागील १५ वर्षांच्या सेवा काळात 150 च्या जवळपास बक्षिसे त्‍यांना प्राप्त झाली आहेत. नांदेड, नागपूरनंतर सध्या ते शेगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय दरवर्षी राज्यभरातून पोलीस दलात उत्तम सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश करून त्यांना सन्मानित करण्यात येते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: