क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेतकरी पुत्राने घेतला गळफास; अमडापूर येथील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास अमडापूर (ता. चिखली) येथे समोर आली. विष्णू गजानन लेकुरवाळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता; मात्र लग्नानंतर काही महिन्यातच फारकती झाली होती.

याबाबत अमडापूर पोलीस स्टेशनला मृतक तरुणाचा चुलत भाऊ भानुदास लेकुरवाळे यांनी फिर्याद दिली. विष्णू काल दुपारी तीनला शेतात पाहणी करून येतो असे म्हणून घरून निघून गेला होता. तो संध्याकाळी साडेसातपर्यंत घरी न आल्याने वडील गजानन लेकुरवाळे व भाऊ भागवत लेकुरवाळे हे त्यांच्‍या अमडापूर शिवारातील गट क्रमांक १०१ या शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना धुऱ्यावरील चिंचेच्या झाडाला विष्णूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. अमडापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वृत्त लिहीपर्यंत विष्णूच्या आत्महत्येचे कारण समोर आले नव्‍हते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: