क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेतकरी महिलेला मागून धक्‍का मारून पाडले, नंतर कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातून गुरांसाठी गवत घेऊन परतणाऱ्या शेतकरी महिलेला मागून धक्का मारून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे १६ जुलैला घडली असून, सोनाळा पोलिसांनी या प्रकरणी १८ जुलैला गुन्‍हा दाखल केला आहे.

सुनिल बळीराम मेहणकार (४३, रा. कोळीपुरा, सोनाळा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, पत्‍नी व तीन मुलींसह राहतात. त्‍यांच्‍याकडे तीन एकर शेती आहे. शेतात पऱ्हाटी आहे. १६ जुलैला दुपारी चारच्‍या सुमारास त्‍यांची आई गं. भा. इंदूबाई बळीराम मेहणकार या रमेश अग्रवाल यांच्या शेतातून पाऊल वाटेने घरी येत असताना कोणीतरी मागून येऊन धक्का मारून पाडले. इंदूबाईंच्या हातातील कुऱ्हाड घेऊन कुऱ्हाडीच्‍या दांड्याने त्‍यांच्‍या मानेवर, हातावर, पायावर मारहाण केली. त्यामुळे मुक्का मार लागला आहे. त्‍यांना आधी सोनाळा प्राथमिक आरोग्‍य केंद्रात, नंतर अकोला येथे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मारहाण करणाऱ्याची ओळख सध्या पटलेली नाही. सोनाळा पोलीस त्‍याचा शोध घेत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: