बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

शेतकऱ्यांची मागणी : ‘समृध्दी’वरील इंटरचेंज दुसरबीडलगत व्हावा!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुंबई –नागपूर समृद्धी महामार्ग हा दळण- वळणाच्या दृष्टीने जलद व सोयीस्कर होणार आहे. महामार्गाला जोडणारा इंटरचेंज हा दुसरबीड गावालगत व्हावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. या बाबतचे निवेदन रस्‍ते विकास महामंडळाच्‍या कार्यकारी संचालकांना परिसरातील शेतकऱ्यांनी दिले आहे.

मुंबई –नागपूर समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा तालुक्यामधून गेलेला आहे. मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा रस्ता दुसरबीडवरून जातो. नोव्हेंबर–डिसेंबर २०१७ ला इंटरचेंज होण्यासंदर्भात सर्व्हेही झाला होता आणि यासाठी ११६ हेक्टर जमिन संपादित होणार होती. २०१७ मध्ये संपादित जमिनीसाठी शेतकऱ्यांच्‍या शेतात खुणाही लावण्यात आल्या होत्या. त्या आज रोजीही आहेत. मात्र शासन निर्णय व शेतकऱ्यांच्‍या गैरसमजुतीमुळे काही लोकांनी जमिनी देण्यास नकार दिला होता व संबंधित विभागाकडून या रस्त्याला स्थगिती मिळाली. दुसरबीड या गावी जिजामाता सहकारी साखर कारखाना असून, जिजामाता जन्म स्थळ २० कि.मी. तर जगप्रसिद्ध लोणार सरोवर अवघे २४ कि.मी. आहे. नांदेड येथील गुरुद्वाराला जाण्यासही अंतर कमी होते. हा इंटरचेंज  या ठिकाणी झाला तर परिसरातील विकास कामे तर होईलच या सोबत रोजगार निर्मितीही होईल व अनेक गरजूंना रोजगार मिळेल. जोड रस्त्यासोबतच या ठिकाणी कृषी हब व्हावे अशी विनंतीही शेतकऱ्यांनी केली आहे.
या इंटरचेंज संदर्भात २ मार्च रोजी समृध्दी महामार्गालगत शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाॅ पठाण, सभापती पती विलासराव देशमुख, गंगाधर जाधव, दिनकरराव देशमुख, अभय चव्हाण, माजी उपसभापती इरफान अली शेख, सरपंचपती प्रकाश सांगळे, गुलशेरखा पठाण, मलकापूर पांग्राचे सरपंच भगवान उगले, तेजराव देशमुख, आलम कोटकर, संतोष शिंगणे, गजानन देशमुख, शिवाजी गुंजाळ, प्रा .सुधीर निकम, प्रविण देशमुख, अनंत देशमुख, सुरेश खंदारे, महेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: