क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा;सिंदखेड राजा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन 50 वर्षीय शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज, 20 फेब्रुवारीच्‍या सकाळी 10 च्या सुमारास मोहाडी (ता. सिंदखेडराजा) येथे घडली.

परमेश्वर श्यामराव रिंढे (रा. मोहाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. परमेश्वर रिंढे घरून सकाळी 9 वाजता शेतात गेले होते. त्यांनी त्यांच्या शेतातीलच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोहेकाँ दिनेश चव्हाण करीत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: