क्राईम डायरीमुख्य बातम्या

शेतातून सव्वा लाखाची तूर चोरी…शेतकऱ्याच्‍या तोंडचे पाणीच पळाले!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हात मोडल्‍याने बरेच दिवस ते शेतात गेले नव्‍हते. काल, 16 एप्रिलला ते शेतात गेले असता गोडाऊनमध्ये ठेवलेली 17 क्विंटल तूर लंपास झाल्याचे दिसले. ही घटना भोटा (ता. नांदुरा) येथे घडली. याप्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत 1 लाख 22 हजार रुपयांचा तूर माल चोरीला गेल्याचे  म्हटले आहे.

भोटा येथील शेतकरी निवृत्ती महादेव पारस्कर यांची हिंगणा भोटा शिवारात शेती आहे. शेतातच त्यांनी माल साठवणूक करण्यासाठी सिमेंट विटांचे पक्के गोडाऊन बांधले आहे. यावर्षी झालेले तुरीचे उत्पादन  34 पोतड्यांमध्ये त्यांनी भरून गोडाऊनमध्ये ठेवले होते. 6 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात पारस्कार  यांचा हात माेडल्‍याने ते तेव्हापासून शेतात गेले नव्हते. काल सायंकाळी ते शेतात गेले असता त्यांना गोडाऊनचा लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. आत ठेवलेली 34 पोतड्यांंतील तूर चोरीला गेल्याचे दिसले. याप्रकरणी आज, 17 एप्रिलला जलंब ठाण्यात त्यांनी तक्रार दिली.तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: