क्राईम डायरी

शेतात जातो सांगून गेले…. वृद्ध शेतकर्‍याने घेतला गळफास!; खामगाव तालुक्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वृद्ध शेतकर्‍याने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोरजवळा (ता. खामगाव) शिवारात आज, 7 जानेवारीला सकाळी समोर आली.

पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरजवळा शिवारात खैरा (ता. नांदुरा) येथील हरिभाऊ दौलत हेलोडे (75) यांची शेती आहे. आज, 7 जानेवारीला सकाळी शेतात तूर काढणीस जातो असे सांगून ते गेले. मात्र त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मजुरास आढळले. त्याने हेलोडे यांच्या घरी ही माहिती कळवली. या घटनेची माहिती पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगावच्या सरकारी रुग्णालयात पाठवला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: