क्राईम डायरी

शेतात युवकाने घेतला गळफास; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःशेतातील झाडाला गळफास घेऊन 32 वर्षीय युवकाने आत्‍महत्‍या केल्याची घटना शेगाव तालुक्‍यातील जवळा बुद्रूक शिवारातील भास्‍कर कोलारे यांच्‍या शेतात काल, 6 मार्चच्‍या सायंकाळी समोर आली.

शेख सद्दाम शेख मोहम्मद (32, रा.जवळा बुद्रूक ता.शेगाव) असे या युवकाचे नाव आहे. त्‍याच्‍या चुलत भावाने घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना दिली. त्‍यामुळे पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. शेख सद्दामने आत्‍महत्‍या का केली, हे आज सकाळपर्यंतही समोर आले नव्‍हते. तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक गजानन मोरे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: