देश-विदेश

संतापजनक! भावावर बंदूक रोखून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओही काढला

मुजफ्फरनगर ः मुजफ्फरनगर येथे अल्पवयीन भावावर बंदूक रोखून चाैघांनी एका अल्पवयीन मुलीवर त्‍याच्‍यादेखत सामूहिक बलात्कार केला. बलात्काराचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेबद्दल कुणाला सांगितले, तर मोबाईलवर काढलेला बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या चाैघांनी दिली. पीडितेच्या अल्पवयीन भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पीडिता १५ वर्षांची, तर तिचा भाऊ १२ वर्षांचा आहे. त्यांचे आई- वडील नातेवाइकाच्या घरी गेले होते. घरी फक्त हे दोघं भाऊ-बहीण होते. हे बहीण भाऊ झोपेत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलानं छतावरून घरात प्रवेश केला. मुलीवर बंदूक रोखून धरली. घराचा दरवाजा उघडला. त्याच्या तीन मित्रांना घरात घेतलं.चौघांनी मिळून पीडितेच्या भावाला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तिच्या भावासमोर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराचा एक व्हिडिओ त्यांनी शूट केला. तिनं तक्रार केली, तर तो व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलगी बेशुद्ध झाली. मुलीच्या भावानं वडिलांना फोन केला. घटनेची माहिती दिली. त्यांचे पालक घरी आल्यानंतर त्यांनी चार मुलांच्या पालकांकडं विचारणा केली, त्यावरून त्यांच्यात भांडणं झाली. हे प्रकरण वाढवलं, तर त्यांना ठार करण्याची धमकी मुलांच्या पालकांनी दिली.

 
 

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: