क्राईम डायरीमुख्य बातम्या

संध्याकाळी घरात घुसून मुलीसह विवाहितेकडे वाईट नजरेने पाहत होता… पीडितेचे पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सैलानीतील रहिवासी एका महिलेला रायपूर पोलीस ठाण्यातील सुरेश मोरे या पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रचंड त्रास वाढला आहे. वाईट उद्देशाने हा पोलीस कर्मचारी महिलेच्या घरात दिवसा – रात्री कधीही घुसतो. घरात घुसण्याचे कारण विचारल्यावर तू दारू विकत नाही का?, असा प्रश्न करतो. तो जाणूनबुजून त्रास देत असल्याची तक्रार या 31 वर्षीय विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सैलानी दर्गा परिसरात भक्त निवासाजवळ ती तिच्या 9 वर्षीय मुलगी व पतीसह राहते. त्यांना चार मुली आहेत. बेताच्या परिस्थितीमुळे तीन मुली आजोबा, आजीकडे पिंपळगाव सराई येथे राहतात. पती मोलमजुरी साठी बाहेर गावी जातात. याचा गैरफायदा घेत 9 जानेवारी 2021रोजी संध्याकाळी रायपूर पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी घरात घुसला. वाईट नजरेने विवाहितेकडे व तिच्या नऊ वर्षीय मुलीकडे बघत होता, असेही या महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे. त्याने बाहेर जावे म्हणून महिलेने त्याला येण्याचे कारण विचारले असता ‘मी पोलीस आहे तुम्ही दारू विकत नाही का ?’ असे तो कर्मचारी म्हणाला. यावेळी तो कर्मचारी साध्या ड्रेसवर होता. यापूर्वी सुद्धा तो अशाच पध्दतीने वागला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित कुटूंब गरीब असल्याने मोलमजुरी करून पोट भरते. पाठिशी कुणी नाही याचा फायदा हा पोलीस कर्मचारी उचलत असल्याचे तिचे म्‍हणणे आहे. घटनेची तक्रार पीडित महीलेने रायपूर पोलीस स्टेशनच्‍या ठाणेदारांसह पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महिला तक्रार निवारण कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: