क्राईम डायरीमुख्य बातम्या

Update : सकाळी झोपेतून उठली अन्‌ 19 वर्षीय विवाहिता झाली गायब

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 19 वर्षीय विवाहिता एकाएकी घरून कुणाला काहीही न सांगता गायब झाली. ही घटना पिंपळगाव सराई (ता. चिखली) येथे काल, 10 मार्चला सकाळी घडली.

लक्ष्मी जितेंद्र ठाकूर (भारज, ता. जाफराबाद, जि. जालना) असे या विवाहित माहिलेचे नाव आहे. तिला मानसिक आजार असल्याने पिंपळगाव सराई येथे नातेवाईकांकडे आणण्यात आले होते. सकाळी 6 वाजता ती झोपेतून उठल्यानंतर बेपत्ता झाली.परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती सापडून न आल्याने आज, 11 मार्चला यासंदर्भात रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 18 जानेवारी 2021 रोजीच तिचे लग्न झाले होते. मात्र मानसिक आजार असल्याने ती काही दिवसांपासून नातेवाईकांकडे पिंपळगाव सराई येथे राहत होती. छायाचित्रात दिसत असलेली महिला आढळल्यास रायपूर पोलीस किंवा अजितसिंग राजपूत पिंपळगाव सराई 9922334900 यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: