क्राईम डायरी

सख्ख्या भावाच्‍या डोक्यात घातली कुऱ्हाड; भावाची मृत्यशी झुंज, खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात लहाना गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खामगावच्या सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. श्याम मुकुंदा सरकटे (३४, रा. बाळापूर फैल सम्राटनगर खामगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून रवी मुकुंदा सरकटे (३९, रा. बाळापूर फैल) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्याम आई, पत्नी आणि भावासह बाळापूर फैलमध्ये राहतो. त्याचा मोठा भाऊ रवीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली आहे. ३ ऑगस्ट रोजी रात्री रवीने त्याच्या आईचे पासबुक व आधारकार्ड घेऊन तुझे पेन्शनचे पैसे मला दे, असे म्हणत वाद घातला. यावेळी श्यामने तू आईला पैसे कशाला मागतो, असे म्हटले असता रवीने त्‍याच्‍या डोक्यात व उजव्या हातावर कुऱ्हाड घातली. तुझा आता गेमच करून टाकतो, असे म्हणाला. श्यामने लगेच कसाबसा घरातून पळ काढला. शेजारच्यांनी लगेच त्याला खामगाव च्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला खामगावच्या सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: