बुलडाणा (घाटावर)

सघन कुक्कुट विकास गट स्थापण्यासाठी बुलडाणा, मोताळ्याची निवड

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2021-22 करिता सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गट स्थापना करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी 50 टक्के अनुदानावर बुलडाणा व मोताळा तालुक्याची निवड झाली आहे.

योजनेतील उद्दिष्टांनुसार निवड समितीमार्फत प्रती तालुका एका लाभार्थ्याची निवड करावयाची असल्याने सर्व प्रवर्गातील इच्छुकांकडून तालुक्यामधून पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असलेले अर्ज 10 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत दोन प्रतित अर्ज पशुसंवर्धन विभाग, पशुधन विकास अधिकारी (वि.), पंचायत समिती स्तरावर सादर करावे. यासाठी पशुपालकाकडे स्वतःची 2500 चौरस फूट जागा दळणवळण, पाण्याची व्यवस्था व विद्युतीकरणाची सुविधा असावी. योजनेमध्ये प्रकल्पाची किंमत 10 लक्ष 26 हजार असून, प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयानुसार पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर 50 टक्के अनुदान रुपये 5 लक्ष 13 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण (DBT) करण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पी. जी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: