देश-विदेश

समलैंगिक संबंध ठेवणार्‍या महिलेला दणका! पतीला मिळणार नुकसान भरपाई

टोकियो : एका महिलेचे दुसर्‍या महिलेसोबत समलैंगिक संबंध असल्याच्या बातम्या आपल्याला केवळ वाचूनच माहीत असतील. पण जपानमध्ये पतीचा विरोध असतानाही एका विवाहित महिलेने दुसर्‍या महिलेसोबत समलैंगिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर त्याची कबुली देत ते तोडण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने तिला एक लाख दहा हजार येन (जपानी चलन) म्हणजे जवळपास ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम पीडित नवर्‍याला भरपाई म्हणून देण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.
सध्या जपानमध्ये सोशल मीडियात या आगळ्यावेगळ्या खटल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसान जपानमध्ये एका विवाहित महिलेचे दुसर्‍या विवाहित महिलेसोबत समलैंगिक संबंध ठेवले होते. ही बाब लक्षात आल्यावर तिच्या पतीने तिला हे संबंध तोडून टाकण्यास सांगितले. पण तिने त्यास नकार दिला. त्यामुळे पीडित पतीने न्यायालयात धाव घेत आपल्या इच्छेविरोधात पत्नीने महिलेसोबत संबंध ठेवल्याचा दावा दाखल केला. पत्नीनेही सुनावणीच्यावेळी न्यायालयात ही बाब मान्य केली. सदर महिलेची व तिच्या मैत्रिणीची ओळख व भेट ऑनलाईन झाली.त्यानंतर त्यांच्यात दोघींमध्ये मैत्री निर्माण झाली. पण आमच्यातील संबंधांमुळे आमचा विवाह मोडला गेला नाही. शिवाय आपण पतीजवळ याची कबुली दिल्याचे त्याची फसवणूक झाली नाही. पण कोर्टाने तिचे म्हणणे ग्राह्या धरले नाही व तिला वरील रकमेचा दंड ठोठावला. आरोपीच्या कृत्यामुळे त्त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग झाली,असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीअशाच एका प्रकरणात महिलेवर दोषी असल्याचा ठपका ठेवत जोडीदाराला धोका दिला म्हणून भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: