बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचा बळी; लोणारमध्ये महिलेचा मृत्यू; जिल्ह्यात आज आढळले 30 पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 जानेवारीला कोरोनाने उपचारादरम्यान लोणार येथील 68 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 69 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 584 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 408 तर रॅपिड टेस्टमधील 146 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर ः 6, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहाँगीर 3, चिखली शहर ः 1, चिखली तालुका : उंद्री 1, शेगाव शहर : 2, शेगाव तालुका : आळसणा 1, टाकळी धारव 1, मोखा बाळापूर 1, बुलडाणा तालुका : बोरखेडी 1, येळगाव 1, गुम्मी 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : कुंड बुद्रूक 1, दसरखेड 4, संग्रामपूर तालुका : अकोली 2, मोताळा शहर : 1
69 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 69 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 17, बुलडाणा : अपंग 7, स्त्री रुग्णालय 13, चिखली : 5, शेगाव : 14, सिंदखेड राजा : 4, मेहकर : 1, लोणार : 5, नांदुरा : 1.
356 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 98720 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12988 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 837 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13507 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 356 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 163 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: