बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सलून व्‍यावसायिकांनाही द्या मुभा; नाभिक महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली असल्याने सलून व्‍यावसायिकांनाही नियमानुसार व्‍यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्‍या बुलडाणा जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्‍याकडे केली आहे.

सलून दुकानेही तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्‍यांच्‍याकडे दुकानांव्‍यतिरिक्‍त इतर कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्‍यातील काही जिल्ह्यांत सलून व्‍यावसायिकांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तशीच बुलडाणा जिल्ह्यातही द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महामंडळाचे मंगेश बिडवे, सचिव पांडूरंग ओरपे, राजू पांडे, गजानन झगरे, रवींद्र सूर्यवंशी, उमेश वाघमारे, नीलेश वैद्य, राजू नाईकवाडे यांनी केली आहे.

मलकापुरातूनही निवेदन…
नाभिक समाज संघटनेच्‍या मलकापूर शाखेनेही जिल्हाधिकाऱ्यांना याच मागणीचे निवेदन दिले असून, त्‍यात त्‍यांनी किमान 3 तास तरी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे म्‍हटले आहे. निवेदनावर श्रावण वाघ, ज्ञानदेव तायडे, प्रसाद पर्वते, दिनेश जाधव, संतोष गणगे, गजानन वाघ, गणेश माळी, शुभम आवटे, राजेंद्र वखरे, ज्ञानदेव आवटे, प्रवीण निवास, प्रल्हाद तायडे, श्रीकृष्ण सोनोने, योगेश तायडे, प्रसाद आमले, कृष्णा परदेशी, दीपक तायडे, गजानन खिर्डेकर, पवन काळे, संतोष गणगे, भगवान वखरे आदींची नावे आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: