बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून कोण बसले होते? “महसूल’मधील कुणाकुणाच्या झाल्या बदल्या?? सर्वप्रथम “बुलडाणा लाईव्ह’वर वाचा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील 6 वर्षांपासून विविध कारणांमुळे एकाच कार्यालयात वा एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. त्यांना आता फेविकोलचा जोड तोडून बदलीच्या ठिकाणी बंधनकारक ठरले आहे. ही कार्यालये लोकाभिमुख असल्याने या बदल्यासंदर्भात कर्मचारी, अधिकारीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकातही उत्सुकता होती.

बदली झालेल्या 11 मंडळ अधिकारी, 26 अव्वल कारकून यांच्या बदलीचा तपशील असा ः (कंसातील स्थान नवीन बदलीचे ठिकाण आहे) मंडळ अधिकारी एस. एस. चौधरी पेठ (चांधई चिखली), जे. एम. येऊल शेलगाव देशमुख (सुलतानपूर, ता. लोणार), एन. व्ही. देशमुख वझर (शेगाव), ए. बी. चव्हाण सुलतानपूर (बिबी), आर. जे. चनखोरे मेहकर (शेलगाव देशमुख, ता. मेहकर), आर. पी. राहाटे डोणगाव (मेहकर), ए. टी. शेळके चांधई (पेठ, ता. चिखली), बी. बी. वाघ दुसरबीड (डोणगाव ता. मेहकर), आर. जी. बघेले धामणगाव बढे (पिंपरी गवळी, ता. मोताळा), आर. बी. दीक्षित शेगाव (वझर, ता खामगाव).

अव्वल कारकून जिल्हाधिकारी कार्यालयातील या कर्मचाऱ्यांची बदली अशी ः नितीन बढे सिंदखेडराजा एसडीओ, एन. एम. खरात सिंदखेड राजा तहसील, जी. बी. जाधव मलकापूर एसडीओ, आर. एन. साठे चिखली तहसील, श्याम ढोले बुलडाणा तहसील, आर. आर. गाठोडे बुलडाणा तहसील, जी. बी. जाधव मलकापूर एसडीओ, आर. एम. सावळे मोताळा तहसील, आर. जे. गवई मोताळा तहसील, सचिन ठाकूर चिखली तहसील, एस. एस. काकडे, खामगाव तहसील, आर. बी. एंडोले खामगाव तहसील, एस. जाधव नांदुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालय, आर. एम. पारस्कार जळगाव जामोद येथून नांदुरा तहसील, प्रकाश डब्बे बुलडाणा तहसील येथून जिल्हाधिकारी कार्यालय, आर. आर. कऱ्हाले सिंदखेड राजा येथून लोणार, आरती नारखेडे नांदुरा येथून जळगाव, व्‍ही. पी. वायाळ चिखलीवरून जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी गलशेटवार संग्रामपूर येथून जळगाव जामोद, जे. एम. बटवे खामगाव येथून नांदुरा आणि एस. पी. राठोड बुलडाणा तहसीलमधून जिल्हाधिकारी कार्यालय.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: