बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सावधान..! जिल्ह्यात उद्या उष्णतेची लाट येणार! 10 एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात उद्या 7 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर 10 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा  गडगडाट होण्याची व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने (नागपूर) हा अंदाज वर्तविला आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये. शेतकऱ्यांनी शेतातील कामे सकाळी किंवा संध्याकाळीच करावीत. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यात बांधून ठेवावे. जनावरांच्या पिण्यासाठी स्वच्‍छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी. तसेच 10 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने  शेतकऱ्यांनी स्वतःची व पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन  जिल्हा कृषी हवामान केंद्र ,बुलडाणा यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: