बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सावळा येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; नवे अवघे ५ रुग्‍ण समोर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 13 जुलैला सावळा (ता. बुलडाणा) येथील 85 वर्षीय महिलेचा बळी घेतला. उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात तिचा मृत्‍यू झाला. दिवसभरात अवघे 5 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्‍याने यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. 47 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयांतून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2219 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 803 तर रॅपिड टेस्टमधील 1416 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : बेराळा 1, संग्रामपूर तालुका : काटेल 1, शेगाव शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : चिंचखेड 1, परजिल्हा पंचगव्हाण ता. तेल्हारा येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 5 रुग्ण आढळले आहेत.

४० रुग्‍णांवर उपचार सुरू
आज 47 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 604865 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86433 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87139 कोरोनाबाधित रुग्ण असून,सद्यःस्थितीत ४० रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 666 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: