क्राईम डायरीमुख्य बातम्या

सासूच्‍या घरात चोरी, जावयावर संशय!; शेगाव येथील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 45 वर्षीय विधवेच्‍या घरातून 25 हजार रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना शेगाव एमआयडीसीत समोर आली असून, महिलेने आपल्या जावयावर संशय व्‍यक्‍त केला आहे. त्‍याच्‍याविरुद्ध संशयित म्‍हणून आज, 17 जूनला तक्रारही दिली आहे.

कुसूम भीमराव गायकवाड या शेगाव एमआयडीसीत राहतात. त्‍यांचे पती दहा वर्षांपूर्वी वारले आहेत. ते नगर परिषदेत नोकरीला होते. त्‍यांना तीन मुली असून, तिघींचे लग्न झालेले आहे. पैकी मधली मुलगी प्रतीक्षा व तिचा पती सागर अंबादास ठाकरे हे लाॅकडाऊनमुळे चार ते पाच महिन्यांपासून कुसूमबाईंकडेच राहायला आले होते. मात्र परवडत नसल्याने कुसूमबाईंनी त्‍यांना दुसरीकडे खोली करून राहण्यास सांगितले होते. यातून जावई आणि मुलीने त्‍यांच्‍यासोबत वादही केला होता. नंतर त्‍यांनी शेजारीच खोली केली.

13 जूनला कुसूमबाई मोठी मुलगी प्रियांका भुसारी (रा. साखळी ता. बुलडाणा) हिचेकडे गेल्‍या होत्‍या. काल रात्री 8 वाजता त्‍या शेगावला परतल्या. तेव्‍हा त्‍यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटात ठेवलेले पेन्शनचे व इतर मजुरीचे नगदी नोटा 15,000 रुपये व चिल्लर अंदाजे 10,000 रुपये असे एकूण 25,000 रुपये कपाटाचे कुलूप तोडून चोरीस गेल्‍याचे त्‍यांना दिसले. दुसऱ्या जुन्या कपाटात ठेवलेले पेचकच व घरातील लोखंडी पहार कपाटाजवळ पडलेली दिसली. जावई सागरला घरात पैसे कुठे ठेवलेले आहे हे माहीत होते. तो मला वारंवार अॉटो व मोबाइल घेण्यासाठी पैशाची मागणी करत होता. मी पैसे दिले नाही त्यामुळे जावयानेच चोरी केली असावी, असे कुसूमबाईंनी तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. दंदे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: