क्राईम डायरीमुख्य बातम्या

सासू- सासऱ्यांनी पकडले, पतीने विष पाजले!; विवाहिता आयसीयूमध्ये!!; धोत्रा भनगोजी येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सासरी नांदण्यास आलेल्या विवाहितेला विष पाजण्यात आल्याची घटन्‍ाा धोत्रा भनगाजी (ता. चिखली) येथे समोर आली आहे. सध्या तिच्‍यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. तिच्‍या जबाबावरून अमडापूर पोलिसांनी पती रमेश गणेश काळे, सासू सौ. वंदना गणेश काळे आणि सासरा गणेश काळे (सर्व रा. धोत्रा भनगोजी) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
सौ. कोमल रमेश काळे (२३) असे विष पाजण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने पोलिसांत जबाब दिला, की तिचे लग्‍न दोन वर्षांपूर्वी रमेश काळे याच्‍यासोबत झाले. तो आर्मीत नोकरीला आहे. ती एक वर्षापासून तिच्‍या आई- वडिलांकडे आलेगाव (ता. पातूर जि.अकोला) येथे राहते. कधी कधी सासरी येजा करत होती. तिचे पती नोकरीदरम्यान बाहेरगावी असल्याने सासू- सासरे तिच्‍याशी भांडण करत होते. यामुळे ती माहेरी आलेगाव येथे राहत होती. गेल्‍या महिन्यात २० जूनला पती सुटीवर घरी आले. त्‍यामुळे त्यांना घरी सासरी येण्याबाबत तिने विनंती केली. मात्र ते टाळाटाळ करायचे. नंतर ये म्हणायचे. तू जशी घरातून गेली तशी ये, असे म्हणत होते, असे विवाहितेने जबाबात म्‍हटले आहे.

६ जुलैला दुपारी ती आजोबा विठ्ठल येऊल (रा. गुंधा ता. लोणार) यांच्‍यासह सासरी धोत्रा भणगोजी येथे आली. दोघे घरी पोहोचले तेव्हा घराला कुलूप होते. त्‍यामुळे ते शेतात गेले. शेतात सासू वंदना काळे सासरे गणेश काळे व तिचे पती होते. मात्र तिला घरी ठेवून घेण्यास सर्वांनी नकार दिला. तरीही विनंती करून तिच्या आजोबांनी तिला तिथे त्‍यांच्‍याकडे सोडून दिले. आजोबा शेतातून जात असताना तिघांनी तिच्‍याशी भांडायला सुरुवात केली. तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये. तेव्हाच येथे राहायचे, असे पती रमेश म्‍हणाला. सासू- सासऱ्यांनी तिला पकडले. पतीने त्याच्‍याजवळ असलेली पांढरी प्लास्‍टिकची विषारी औषध असलेली बाटली तिच्‍या तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. झटापटीमुळे काही औषध तिच्‍या तोंडात गेले व बाकी अंगावर सांडले. आरडाओरड झाल्याने तिचे आजोबा धावत परत आले. तेव्हा पती, सासू-सासरे तिघेही तिथून निघून गेले, असेही जबाबात म्‍हटले आहे. तिला अस्वस्थ वाटल्याने आजोबाने जिपमधे टाकून अमडापूर येथील सरकारी दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला चिखली येथील दवाखान्यात नंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्‍णालयात भरती करण्यात आले. सध्या ती आयसीयूमध्ये भरती आहे. तिच्‍या जबाबावरून पोलिसांनी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास अमडापूर पोलीस करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: