बुलडाणा (घाटावर)

सिंदखेडराजा ः सरपंच संघटनेच्‍या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांविरोधात संताप

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सरपंच म्हणजे गावविकासाचा कणा असून, गावच्या अडी अडचणीत त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. कोविडच्या 19 च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सरपंचाने आपल्या गावात प्रभावीपणे काम केले आहे. गावगाडा टिकवायचा असेल तर राजकीय अभिनिवेश बाजूला सारत सरपंचाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे व गावाला प्रगतीच्या दिशेने नेले पाहिजे, असे उदगार ग्रामविकास चळवळीचे कार्यकर्ते, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रविण गिते यांनी सिंदखेड राजा तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत काल, २५ मार्चला केले.
अध्यक्षस्थानी सभापती गजानन बंगाळे होते. तहसीलदार सुनिल सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, विस्तार अधिकारी श्री. घुगे, श्री. पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामदास कहाळे, उपाध्याक्ष तोताराम ठोसरे, ज्‍येष्ठ सरपंच डॉ. भुजंगराव गारोळे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सभापती गजानन बंगाळे व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती अण्णा खरात ,सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामदास कहाळे, डॉ. भुजंगराव गारोळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत नविन आलेल्‍या गटविकास अधिकाऱ्यांबद्दल संताप व्‍यक्‍त करण्यात आला. ते सरपंचांना उद्धटपणाची वागणूक देतात. सरपंच घेऊन आलेल्या कामांच्या प्रस्तावावर सह्या करत नाहीत, असा आरोप करण्यात आला. यापुढे सरपंच मंडळींना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा विश्वास विस्तार अधिकारी श्री. घुगे व श्री. पवार यांनी दिला. सूत्रसंचालन भानुदास लव्हाळे यांनी केले. आभार गजानन नागरे यांनी मानले. या वेळी विनोद खरात शिंदी, गजानन नागरे सोनोषी, सूर्यकांत काकडे वडाळी, शिवाजी गव्हाड वाघोरा, भगवान पालवे चिंचोली जहाँगीर, नितीन शेळके धांदरवाडी, संदिप देशमुख डावरगाव, संतोष तांबेकर शिवणी टाका, संतोष राठोड दत्तापूर, अतिषकुमार राठोड पिंपरखेड बुद्रूक, उमेश शेजूळ राजेगाव, संदीप लंबे सायाळा, रामकिसन नागरे जळगाव, अनिल काकडे पिंपळखुटा/ऊगला परमेश्वर खंदारे कोनाटी, संपता ससाने केशवशिवणी, अंबादास बुंधे तांदुळवाडी ,राजू गायकवाड देऊळगाव कोळ, संपतराव पवार कंडारी, शालीकराम खरात देवखेड, शिवशंकर वायाळ निमगाव वायाळ, गणेश किंगरे सुलजगाव आदी सरपंच हजर होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: