बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

सिंदखेड राजा ः आडत दुकानाला आग लागून 41 लाखांचा माल खाक!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भगवान बाबा ट्रेडर्स या आडत दुकानाला आज, 9 फेब्रुवारीला सकाळी आग लागली. आगीत सोयाबीन, तूर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण 41 लाख रुपयांचा माल जळून खाक झाला.
आग लागल्याचे आडत दुकानदार अशोक श्रीराम वाघ यांना सकाळी कळाले. त्यांनी तातडीने पाण्याचे टँकर बोलवत आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती त्यांनी सिंदखेड राजा पोलिसांनाही दिली. आगीत 273 क्विंटल सोयाबीन, 64 क्विंटल तूर, 367 क्विंंटल मूग, 94 क्विंटल मका, 103 क्विंटल ज्वारी, 6 क्विंटल हरबरा खाक झाला आहे. लाईट वायर जळालेले दिसून आले व ताडपत्री सुध्दा जळालेल्या अवस्थेत दिसल्या. आग शॉक सर्किटमुळेच लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आगीमुळे ताडपत्री, बारदाना, व शेतमाल असा सर्व मिळून 41 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: