बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

‘सिर्फ 120’ ! मात्र 8 रुग्णांचा मृत्यू!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जेमतेम आठवड्यापूर्वीच जिथे एकेका तालुक्यात दीडशे-दोनशेच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह निघायचे तिथे आता सर्व जिल्हा मिळून दीड-दोनशे पेशंट निघाताहेत! होय, आज, 30 मे रोजी जिल्ह्यात अलिकडच्या काळातील निच्चांकी म्हणजे केवळ 120 रुग्णाची नोंद झाली. मात्र तीनेक दिवसांपासून आटोक्यात असलेल्या मृत्यूच्या आकड्याने पुन्हा उसळी घेतली! गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 8 बळींची नोंद झाली आहे.
बुलडाण्यातील महिला रुग्णालयात 5, निकम हॉस्पिटलमधील 1, लद्धड हॉस्पिटलमधील 1, श्यामसखा हॉस्पिटलमधील 1 रुग्ण उपचार दरम्यान दगावले. त्‍यामुळे एकूण बळींचा आकडा 601 वर गेला आहे. बळींची ही संख्या वगळता पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा अविश्वसनीय वाटावा असाच आहे. बुलडाणा 27, मेहकर 25, खामगाव 12, शेगाव 1, देऊळगाव राजा 10, चिखली 9, मलकापूर 2, नांदुरा 10, लोणार 12, जळगाव जामोद 2, सिंदखेड राजा 1 व संग्रामपूर निरंक असा आजचा आकड्याचा मर्यादित खेळ आहे. पॉझिटिव्ह कमी पण बळी 8 यामुळे आजचा अहवाल संमिश्र असाच म्हणावा. सध्या 2622 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 594 रुग्‍णांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: