क्राईम डायरीमुख्य बातम्या

सीसीटीव्‍हीच्‍या नजरकैदेतील 6 घंटागाड्यांच्‍या बॅटऱ्याच गेल्या चोरी!; देऊळगाव राजातील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सीसीटीव्‍हीच्‍या नजरकैदेत असूनही नगरपरिषदेच्‍या मालकीच्‍या 6 घंटागाड्यांच्‍या बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.  त्‍यामुळे देऊळगाव राजात खळबळ उडाली आहे. न.प. आवारात रात्रीतून ही घटना घडली असून, आज, 10 मे रोजी सकाळी समोर आली.

सकाळी शहरातील घनकचरा उचलण्यासाठी घंटागाड्या चालक सुरू करू लागले तेव्‍हा ही बाब समोर आली. चालकांनी घटनेची माहिती कर्मचारी श्री. सुनगत यांना सांगितली. श्री. सुनगत यांच्या तक्रारीवरू चोरट्यांविरुध्द देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घेतला जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: